Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, July 11, 2014

1 अनंते ठेविले तैसेचि राहावे ----

परवा असाच बाप्या रस्त्यात भेटला. पुन्हा तोच पवित्रा. परंतु या वेळेला प्रश्न नव्हता, अगदी संत तुकाराम घेऊन. आम्हाला असाच काहीं न काही शिकवून जातो.
 मला म्हणाला, तू गणिताचा विद्यार्थी. तुला Newton  चा पहिला नियम माहित आहे. मी म्हणालो, हो, जडत्वाचा नियम.
तर म्हणतो कसा 'अरे या Newton ने आमचा संत तुकाराम  वाचला असता ना तर डोक्यावर घेऊन नाचला असता.

मला काहीच कळत नव्हते. मी म्हणालो, 'अरे Newton काय आणि संत तुकाराम  काय? हे काय लावलंय तू. Newton हा एक वैज्ञानिक आणि संत तुकाराम  यांचा काय संबंध.
तर म्हणतो कसा, 'वाहो लेकहो, तुम्ही एव्हडी मोठी मोठी बुकं वाचलीत आणि माहित नाही. आता मात्र माझा तोल सुटू लागला. वाटलं याला म्हणावं 'आता जातो मी, तुझा Newton  आणि संत तुकाराम  नंतर कधी ऐकेल.

आता जाऊ देईल  तर तो बाप्या कसला! म्हणाला 'बघ, आठव संत तुकारामाचा अभंग .'  मी म्हणालो, 'अरे बाप्या, ते तर  आख्ख भांडार आहे.
त्यावर बाप्या म्हणतो, ' अरे आख्ख भांडार नाही आठवायचं, बघ आपण नेहमीच त्याचा वापर करतो.'
मी म्हणालो, अरे बाप्या, तू तर आता 'कौन बनेगा मराठी करोडपतीच्या' च्या सचिन खेडेकर सारखी आमची परीक्षा घेत आहे.

शेवटी  मी वैतागलो त्याला म्हणालो आता काय ते तूच सांग. मला नाही सांगता येत.
त्यावर बाप्या म्हणतो, ' अरे, 'अनंते ठेवले  तैसेचि राहावे ' हा जडत्वाचा नियम नाही का?' ' अरे हाच तो Newton चा पहिला नियम.
आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला 'अनंते ठेविले तैसेचि राहावे, चित्ती  असू द्यावे समाधान.'
अनंते ठेविले तैसेचि राहावे ------ unless and until unbalanced external force या परमात्म्याने वापरल्याशिवाय ------
 आता आपण Newton  चा पहिला नियम म्हणजेच जडत्वाचा नियम पहिला आणि त्याचा संबंध संत तुकारामाशी  कसा हे बाप्या कडून शिकलो.

पुढे संत तुकाराम  म्हणतात - - चित्ती असू द्यावे समाधान.
मला येथे रवींद्रनाथ टागोरांची गोष्ट आठवते :  एकदा एक भिकारी सकाळी तयार होऊन भिक मागण्यास निघतो. आधीच आपल्या झोळीत थोडे तांदूळ घेतो. भिकारी कधीही रिकामी झोळी किंवा
रिकामी थाळी फिरवत नाही. याबद्दल मानसशास्त्र काय म्हणत कोणास ठाऊक? परंतु आज भिकारी आनंदात निघतो कारण त्याला माहित असतं आज गावात सण आहे. भिक्षा भरपूर मिळणार. असाच  आनंदात मुख्य रस्त्यावर येतो. पाहतो तो समोरून राजाचा रथ येत आहे. अधिक आनंदी होतो. राजा येत आहे, मी त्याच्या कडून काय काय मागू? सोने, पैसे, वगैरे वगैरे. अरे आता मी तर भिकारी नाही राहणार. तेव्हड्यात, राजाचा रथ  येउन थांबतो. राजा रथातून उतरतो. भिकारी आनंदात काय मागू विचारच करतोय, तेव्हड्यात राजा  म्हणतो, ' मला आज राजज्योतीशीने सांगितले कि आज सकाळी जो तुला पहिल्यांदा भेटेल . त्याला  तू भिक स्वरुपात काहीतरी माग जर त्याने तुला दिले तर या राज्यावर येणारे संकट टळेल. भिकाऱ्याने झोळीत हात घातला, मुठभर  तांदूळ घेतले. मग  विचार केला एवढे कशाला द्यायचे. शेवटी राजाच्या  हातावर तांदळाचा एक दाणा ठेवतो. राजा रथात चढतो आणि  रथ निघून जातो. भिकारी दुख्खी होतो. माझा एक तांदळाचा दाणा कमी झाला. गावात जातो. प्रत्येक घरातून त्याला भिक मिळते. झोळी भरून जाते परंतु भिकारी दुख्खीच, कारण तांदुळाचा एक दाणा. संध्याकाळी घरी येतो.पत्नी भरलेली झोळी पाहून खुश होते. भिकारी चिडतो व सर्व प्रसंग सांगतो. पत्नी समाधानी असते. या कथे कडे दुर्लक्ष करते. आणि झोळी उलटी करते. आता झोळीत खाली असलेले तांदुळाचे दाणे सर्वात वर येतात, त्यात एक सोन्याचा दाणा असतो. पत्नी अत्यंत आनंदित होते, सोन्याचा दाणा. भिकारी पण पाहतो, तो हि अत्त्यन्त आनंदीत  होतो. कारण सोनं आयुष्यात  कधी पाहिलेलं नसतं. परंतु भिकाऱ्याचा हा आनंद थोडाच वेळ टिकून राहतो. त्याच्या मनात विचार येतो, मी जर मुठभर तांदूळ दिले असते तर? मी जर सर्वच तांदूळ दिले असते तर? भिकारी पुन्हा दुख्खी झाला. कारण समाधान नाही.

यावर बाप्या लगेच म्हणाला, हे अगदी नेपोलिअन प्रमाणेच न! मी म्हणालो कसे? तर बाप्या म्हणतो, ' या नेपोलिअनला जेव्हा सेंट हेलेना बेटावर नजर कैदेत ठेवलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, 'मला माझ्या आयुष्यातला एकही क्षण आठवत नाही ज्याला मी सुखाचा क्षण म्हणेल. अरे, या नेपोलिअन जवळ नाव, लौकिक, ऐश्वर्य सर्व काही होतं तरी त्याला एकही सुखांचा क्षण आठवत नाही.
मी काही म्हणू एव्हढ्यात बाप्या म्हणतो,  'अरे, नाहीतर 'हेलेन केलर' कडे पहा. ती आंधळी होती, बहिरी होती,मुकी होती, तरीपण आपल्या एका पुस्तकात ती लिहिते, " I found this world, the most beautiful.'

समाधानी चित्त असेल तर माणूस किती आनंदी असतो. मी म्हणालो, 'अरे बाप्या, Newton  ने जर पहिली ओळ वाचली असती न तर त्याने डोक्यावर घेऊन नाचला असता आणि दुसरी ओळ वाचली असती तर अगदी उत्सव मनवला असता.

हा बाप्या असाच काहीतरी घेऊन येत असतो आणि आम्हाला विचार करायला लावतो.

 दत्तात्रय पटवर्धन

1 comment:

  1. समाधान असेल तर आनंद जिवन व्यापुन राहतो. कथेच्या माध्यमातुन मोठ्या कल्पकतेने मांडले आहे.

    ReplyDelete