Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Wednesday, September 16, 2015

0 राज़ उल्फत का छुपाए जायेंगे !!

राज़ उल्फत का छुपाए जायेंगे 
हम उसी को आजमाए जायेंगे I 

क्या है हस्ती, मुस्कुराए जाएगें
दर्द को भी हम मिटाए जाएंगे, I 

डर के गर हम मौन सहते जाएंगे 
टूटकर एक दिन बिखरे जाएंगे I 

देश पर जां को लुटाते जाएगें 
नाम रोशन खास करते जाएंगे I 

व्यर्थ सब हम क्यों बटोरे जाएगे
क्या है जो हम संग लेके जाएगे I 

तोडकर सब बेडियां ये जाएगे
इक नया संसार वो दे जाएगे I 

मुफ्लिसी में यूं सताये जाएंगे
एसी कमरे में सुलाये जाए I  

ये हवस तू छोड मारे जाएंगे  
कर फकीरी, सब लुटाते जाएंगे I

-  प्रकाश पटवर्धन, पुणे. 

Wednesday, September 9, 2015

0 आप को जाना था...



आप को जाना था...
आपको जाना था तो हमको बता कर जाते
मन के मंदिर में छवि अपनी बसा कर जाते I

खा़ब आंखों में मेरे यूं न सजाकर जाते  
हर तरफ़ दिल के ये टुकड़े न गिरा कर जाते I 
*  
हाल दिल का न सनम हम से छुपाकर जाते
एक बस घाव जरा दिल पे लगाकर जाते I 

हमने इक उम्र गुज़ारी है वफ़ा पाने को,
जाते जाते ही सही यार वफ़ा कर जाते I 
*  
आप हम से तो भला आंख मिलाकर जाते
साकिया हम को जरा जाम पिलाकर जाते I 

याद आती है सदा दर्द बढा़ जाता है  
यूँ सताना था तो दिल को भी मिटा कर जाते I
                          -  प्रकाश पटवर्धन, पुणे.

Saturday, June 27, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १५




मला उर्दू शायरीचे वेड केव्हा लागले हे निश्चित आठवत नाही. बहुदा शालेय वयातच माझा आणि उर्दू शायरीचा संबंध आला असावा. उन्हाळ्याच्या सुटीत असाच एक पुस्तक  वाचत बसलो  होतो आणि एक शेर वाचण्यात आला. उन्हाळा सुरु असल्यामुळे हवा मुळीच नव्हती. झाडाच पानही हलत नव्हत. या कडाक्याच्या उन्हात सर्वजण हवेच्या झुळूकीची वाट पाहत असत.हवेची जराशी झुळूक आली कि अगदी हायसं वाटायचं. तो शेर मी दोन तीन वेळा वाचला आणि अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. शेर असा होता,

हवा चले ना चले लोग इंतजार में है ,
खुली हुवी है अभी, खिडकिया मकानो की.            ----  कैसरुल जाफरी

मला वाटले की लोकांनी घराच्या खिडक्या उघडून ठेवल्या आहेत. कारण गर्मी खुप आहे. हवा येवो अथवा ना येवो परन्तु लोकांची प्रतीक्षा चालूच आहे. आणि वरवर पाहता मला वाटलं की कविने याच परिस्थितीचे वर्णन केलेलं असावं.

पुढे मोठा झालो विचारांची खोली वाढली आणि लक्षात आलं की या दोन ओळींच्या मध्ये खूप काही दडलं आहे. मग हि हवा कसली तर हि हवा आहे बेहतर जीवनाची, सच्चाई ची, बेहतर समाजाची, खुशाली ची अगदी सध्याच्या BJP च्या " अच्चे दिन आनेवाले है" या घोषणेत दडलेल्या विचारांची. आता 'खिडकिया मकानोकी' याचा संकेत कुठे आहे, तर तो ' रुधयाची कवाडे,' बुद्धीची कवाडे ' याकडे  आहे.

म्हणजेच 'अच्चे दिन आनेवाले है' या प्रतीक्षेत लोकं आपल्या हृदयाची कवाडे उघडून बसली आहेत. रामराज्य यईल, सर्वदूर न्यायाचा बोलबाला असेल, समाजात असलेली श्रीमंत गरीब यांच्या तील दरी नष्ट होईल, समाजातील असमानातेला तिलांजली दिली जाईल. जगात
खुशाली नांदेल. अशा हवेच्या प्रतीक्षेत माणसे आपल्या घराची दारे, खिडक्या  उघडून बसले आहेत. आशा आहे या जगाच नंदनवन होण्याची , उम्मीद अजून बरकरार आहे. अशी शायरी वाचली कि वाटतं मातीच्या इवल्याश्या भांड्यात जणू समुद्र भरून ठेवला आहे.

उर्दू शायरी मध्ये अथवा कोणत्याही कवितेत संकेत कोठे आहे हे कळणे महत्वाचे असते. शायर आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे याची जाण यावी लागते. 


 दत्तात्रय पटवर्धन

Tuesday, June 16, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १४



भाग ११ मध्ये आपण पाहिले कि चिराग हा शब्द कसा वेगवेगळ्या संकेताने वापरला जातो.आज एका घटनेमुळे एका उर्दू शेर ची आठवण झाली. घटना अशी कि दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांना पोलिसांनी फर्जी डिग्री असल्याबाबत अटक केली.कायदे मंत्री याची वकिलीची डिग्री खोटी हा केव्हडा मोठा अपराध. परंतु या अटकेचे समर्थन करण्या ऐवजी  अरविंद केसरीवाल यांनी या अटकेची निंदा करण्यास सुरवात केली. केद्र सरकार वर आरोप ठेवण्यात आलेत. आप पार्टीला बदनाम करण्यासाठी भाजप ची हि कुटनीती आहे. अरविंद केसरीवाल  यांनी आप पार्टीची स्थापना केली होती ती भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी. आणि त्याच्या कायदे मंत्रीच खोट्या डिग्री बाबत जेल मध्ये गेला आणि आप पार्टीच्या या विचारधारेला काळिमा फासला. जितेंद्र तोमर आणि समर्थन करणारे सर्वच आप पार्टीचे वंशाचे दिवे.

शायर म्हणतो,

दिल के फफोले जल उठे सीने के दाग़ से
इस घरको आग लग गई, घरके चराग से.               अज्ञात

आधीच हृदयात असलेले फ़फ़ोले त्याची आग असह्य. त्यात असा डाग, मग त्या आगीची तीव्रता अधिक भडकणार नाही तर काय? वंशाच्या दिव्यानेच घराला आग लावली काय करणार?

येथे चिराग या शब्दाचा अर्थ "वंशाचा दिवा" असा होतो.




चिराग या शब्दाचा उपयोग केलेला असाच एक शेर मला आठवतो,

शब-ए-इंतजार की कश्मकश में न पूछ कैसे सहर हुई,
कभी इक चराग जला दिया, कभी इक चराग बुझा दिया.                 मजरूह

येथे चिराग या शब्दाचा सांकेतिक अर्थ  स्वप्नांचा चिराग, आशेचा चिराग, असा आहे.

शब-ए-इंतजार च्या कश्मकश ( उलझन) मध्ये सकाळ  कशी झाली  म्हणून काय सांगू!  कधी एक दिवा  प्रज्वलित केला तर कधी एक दिवा विझवला. म्हणजेच  एक स्वप्न पाहिलं ते बाजूला सारलं मग दुसरं स्वप्न पाहिलं तेही बाजूला केलं. मग तिसर, चौथ अशी स्वप्नांची श्रुखलाच निर्माण झाली आणि सकाळ केव्हा झाली आम्हाला कळलंच नाही.
ज्यावेळेला आयुष्यात काही काळासाठी अंधकार निर्माण  होतो त्यावेळेस स्वप्न फार महत्वाची ठरतात. It acts as buffer between you and the situation.


दत्तात्रय पटवर्धन


Thursday, June 11, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १३



जगात काही माणसे आभाळा एव्हडं काम करून जातात. सर्वच माणसे इच्छा असून देखील भव्य दिव्य काम करू शकत नाहीत. परंतु काही माणसे रस्त्यातून जाताना रस्त्यातील काटे उचलण्याचे काम करतात जेणे करून त्यांच्या मागून येणाऱ्यांना त्या काट्यांचा त्रास होऊ नये. व अशा लोकांना काही काटे कमी करण्याच श्रेय द्याव लागत. अशा रीतीने प्रत्येक व्यक्ती काहीना काही योग्य कार्य करून या जगाला सुंदर करीत असते.

साहीर लुधियानवी यांचा एक शेर याच गोष्टीचा उहापोह करतो,

माना की इस जमीं को न गुलजार कर सके,
कुछ ख्वार कम तो कर गए, गुजरे जिधर से हम.

साहिरजी म्हणतात, "आम्ही या जगाच नंदनवन तर करू शकलो नाही परंतु ज्या ज्या मार्गावरून आम्ही प्रवास केला त्या मार्गातील काही काटे कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला." कुछ ख्वार, येथे हाही अहंकार बाळगलेला नाही कि सर्व काटे दूर केले. आम्हाला शक्य होते तितके केले.


सर्व प्रथम ज्या व्यक्तीने आपल्या घराबाहेर रात्रीच्या वेळेस दिवा लावण्यास सुरवात केली तेव्हा त्या व्यक्तीची सर्वांनी थट्टा केली. त्याच मार्गावरून जाताना  ज्या ज्या लोकांना त्या दिव्याच्या उजेडामुळे मार्गक्रमण करण्यास मदत झाली त्यांनीही आपल्या घराबाहेर दिवा लावण्यास सुरुवात केली आणि येथूनच स्ट्रीट लाईट ची कल्पना जगासमोर आली. आज त्या व्यक्तीच्या या छोट्याश्या कृत्यामुळे आम्हाला स्ट्रीट लाईट मिळाले. हे जग सुंदर होण्यास मदत झाली. असेच रात्यावरून काटे वेचत चला एक दिवस नक्कीच या जगाच नंदनवन होईल.जगाच नंदनवन करण्यात आपलाही खारीचा वाटा असावा.

जां निसार खां अख्तर यांचाहि असाच एक शेर आहे.

जिंदगी ये तो  नहीं तुमको सवारा ही न हो,
कुछ न कुछ कर्ज तेरा हमने उतारा ही न हो.

मान्य आहे कि  निसर्गाने आम्हाला भरभरुन दिलेलं आहे.  या जीवनाचे आमच्या वर खूप उपकार आहेत. परंतु हे जीवन सुंदर करण्यास आम्ही काहीच केले नाही असे नाही. हे उपकार, कर्ज फेडण्यासाठी आम्हीही काहीना काही केलेलं आहे. आमचा खारीचा वाटा नक्कीच थोडं कर्ज उतरवण्याच काम करीत आहे.

दत्तात्रय पटवर्धन.

Tuesday, June 2, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग 12



मैत्री म्हटली कि ती मैत्री निभावण्याच्या आणाभाका , त्या शपथा, आठवतात. अनेक वेळा काहीना काही कारणावरून दिलेला शब्द  निभावता येत नाही  आणि मैत्री तुटते. या आणाभाका ज्याला उर्दूत 'वफा' म्हणतात आणि त्याविरुद्ध म्हणजे 'जफा'.
वफा आणि जफा या दोन शब्दांचा उपयोग  उर्दू शायरीत अनेक वेळा केलेला आढळतो. प्रेमावर जितकी शायरी आहे तितकीच शायरी वफा आणि  जफा वर आहे.

आता हाच शेर पहा,

जफ़ा के जिक्र पे तुम क्यो  संभल के बैठ गए,
तुम्हारी बात नहीं, बात है ज़माने की .                                          मजरूह सुल्तानपुरी

असे म्हणतात की truth should be sugar coated,  कारण सत्य गिळण्यास कठीण असतं. येथे शायर एक sugar coated pill आपल्याशी जफा (शपथेचा भंग करणाऱ्याला ) करणाऱ्याला देत आहे. तो म्हणतो की जेव्हा जफा ची ( जुलुमाची, शपथ तोडल्याची ) चर्चा सुरु झाली त्यावेळेस तू स्वतःला सावरून बसलीस. कारण तुला भीती होती की कुठे यात तुझंही नाव तर येणार नाहीना? तुलाही माहित आहे  की घेतलेल्या शपथेचा भंग कोणी केला. तुझी ती दयनीय स्थिती बघवली नाही व मी तुला इशारा केला की आंम्ही तुझी  गोष्ट करीत नाहीत,  be comfortable, be relaxed, आम्ही तर जगाची गोष्ट  करीत आहोत की हे जग किती जुलमी आहे. किती सौम्य रीतीने शायर तिच्या तोडलेल्या शपथेची कल्पना तिला करून देत आहे.

रंज तो ये है की वो अहले-वफ़ा टूट गया,
बेवफा कोइ भी हो, तुम न सही, हम ही सही.                              डॉ राही मासूम रझा

मैत्रीत केलेल्या आणाभाका अनेक वेळा तुटतात, त्याला नक्कीच कोणी न कोणी जवाबदार असतो. शायर म्हणतो की आपली मैत्री तुटली याच मला दु:ख आहे. आपण मैत्री निभाऊ शकलो नाही हीच जीवनाची tragedy  आहे. मग हि मैत्री कोणामुळे तुटली हा भाग दुय्यम आहे. तुझ्यामुळे नाही तर मान्य आहे की माझ्यामुळेच हे झाले. या वर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. आपली मैत्री तुटली हीच एक गोष्ट सत्य आही आणि त्याचच मला दु:ख आहे.

मेहबूब से भी हमने निभाई बराबरी,
वां लुत्फ़ कम  हुवा, तो यहाँ प्यार कम हुवा.                             मोमिन खां मोमिन

लुत्फ़ : आनंद, मजा , मिठास

शायर म्हणतो की मेहबूब बरोबर आम्ही बरोबरी निभावली. तिकडे लुत्फ़ कमी झाला म्हणजेच तिच्यातल सौंदर्य कमी झालं , तिच्या बरोबर बसण्यात आणि गप्पा मारण्यातला आनंद कमी झाला, तिच्यातली मिठास कमी झाली म्हणून आमच् प्रेमही कमी झालं. असा अर्थ आपण लुत्फ़ चा डिक्शनरी अर्थ घेतल्यास काढू. इथेही शायर एक sugar coated pill देत आहे. येथे लुत्फ अर्थ आहे वफाई कडे. तो म्हणतो की तिकडे वफा कमी झाली आणि त्याच प्रमाणात इकडे प्रेमही कमी झाले. अशा रीतीने आम्ही बरोबरी निभावून नेली. अप्रत्यक्षरित्या शायर दोष आपल्या कडे ठेवून तिला तिच्या बेवफाईची  जाणीव करून देत आहे.


दत्तात्रय पटवर्धन

Sunday, May 31, 2015

1 शायरीचा गुलदस्ता भाग 11


उर्दू शायरी मध्ये 'चिराग' शब्दाचा प्रयोग अनेकदा केलेला आपणाला आढळतो. चिराग या शब्दाचा अर्थ 'दिवा' असा होतो.परंतु चिराग हा शब्द वेगवेगळ्या संकेताने अनेक वेळा वापरलेला दिसतो. असाच एक शेर पहा,

शहर के अंधेरे को इक चिराग काफी है.
सौ  चराग जलते है इक चराग जलनेसे.                         अज्ञात

समाजात जो अंधार पसरलेला आहे, ज्या कुप्रथा रूढ झालेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी एका दिव्याची गरज असते. येथे 'चिराग' हा शब्द आदर्श, सभ्य, संस्कारी माणसाच प्रतिक आहे. एक झिजस, एक राम, एक महात्मा गांधी, एक सावरकर, एक भगत सिंग, एक टिळक,  एक बाबासाहेब आंबेडकर, हजारो लाखो लोकांना जागृत करतात. अन्याया विरुद्ध जुलमी राजवटी विरुद्ध, उठाव करण्यास प्रवृत्त करतात.  अशी एकच व्यक्ती समाजातील  अंधकार दूर करण्यास समर्थ असते कारण तोच दिवा हजारो दिव्यांना प्रज्वलित करतो म्हणजेच एक व्यक्ती हजारो लाखो लोकांना कार्य सिद्धीस नेण्यास प्रवृत्त करत असते.

हथेलियोने  बचाया बहुत चरागों को,
मगर हवा भी अजब जाविए बदलती है.                           अज्ञात

जाविए : कोण, angles

जेव्हा हवा सुरु होते तेव्हा दिवा विझु नए म्हणून आपण त्या दिव्याला हाताने झाकतो. येथे 'चराग' म्हणजे एखादा उत्कट विचार, संस्कार, प्रथा, किव्वा सभ्यता. 'हथेली' हे सभ्य माणसाच प्रतिक. म्हणजेच सभ्य माणसांनी हे संस्कार, ही सभ्यता समाजात  टिकून राहण्यासाठी कसोशिने प्रयत्न केलेत. परंतु "हवा भी अजब जाविये बदलती है."   परंतु जुलुमी हवा वेगवेगळ्या दिशेने या दिव्यावर आक्रमण करून हा दिवा विझवण्याचा प्रयत्न करत असते.

दत्तात्रय पटवर्धन

Wednesday, May 13, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास : भाग ७

पर्शिया मध्ये या खेळात काही बदल करण्यात आलेत. आपणाकडे जो 'गज' होता तो पाच घरात चालत असे.
एक समोरील घरात, हे सोंडेचे प्रतिक होते. आणि एक घर कर्ण रेषेत, अशी चार घरं, जी चार पायांचे प्रतिक होते.
परंतु पर्शिअन सैन्यात गज म्हणजेच हत्ती चे महत्व नव्हते म्हणून त्यांनी गज ( bishop ) चे समोरील घरात
जाणे बंद केले व त्या ऐवजी कर्ण रेषेत एका ऐवजी दोन खरात जाण्याचे बळ दिले. पर्शिअत या खेळावर
भारतापेक्षा  जास्त विचार करण्यात आला तसाच त्यांनी एक महत्वाचा बदल केला तो हा कि जर राजावर जोर
असेल तर "शाह" म्हणून घोषणा करायची. हाच शब्दप्रयोग आपण सध्या 'शह' म्हणून उदगारतो. हीच घोषणा
पुढे इंग्रजीत 'चेक' म्हणून प्रचारात आली. अशी घोषणा करण्या मगच उद्देश हा कि शत्रुपक्षाला सचेत करणे कि
तुझा राजा धोक्यात आहे जेणे करून त्याचे लक्ष नसेल तर राजा मरेल आणि डाव आकस्मित पणे संपेल.पुढे
'check  mate ' सारखे शब्द प्रयोगात आले.

जेव्हा राजा कोणत्याही घरात सरकू शकत नाही,म्हणजेच असे कोणतेही घर राजा साठी उपलब्ध नसते जेथे
ते घर शत्रू पक्षाच्या जोराविना आहे. अशा परिस्थितीस पर्शिअन लोकं 'मानद'असे महानत. याचा अर्थ गोंधळलेला यातूनच पुढे 'mate ' हा शब्द प्रचारात आला. म्हणूनच 'mate ' चा अर्थे 'राजा मेला' असा न होता 'गोंधळलेला राजा' असा होतो.

पर्शिआत 'चतुरंग' चा 'झतरंग' असा अपभ्रंश झाला. राजाचे नामकरण 'शाह' म्हणून करण्यात आले. चातुरांगातला 'मंत्री' हा 'फर्झीन' झाला . घोडा अस्प , बिशप (elephant ) पिल तर foot soldier हा पियादा म्हणून नावारूपास आला. फर्झीन या
शब्दाचा उपयोग संत कबीर तसेच संत रहिम यांच्याही डोह्यांत सापडतो,
उदा. बडा बढाई न करे, छोटा बहु इतराय
        ज्यो प्यादया फरझी भया , तेढा तेढा जाय || ( कबीर )

रहिमान सिधी चाल सो प्यादा होत वजीर
फरजी साह न हुई सके, गती तेढी तासीर. || ( रहीम )

Monday, May 4, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १०.

निदा फाजली, एक चालत बोलत अंजुमन ,   यांची हि गज़ल आहे. 
प्रत्येक गज़ल हि काहीना काही आशय  घेऊन येते. प्रत्येक शेर वेगवगळ्या विषयाशी ओळख करून देतो.
गजल वाचल्यावर प्रत्येकाला असे वाटते की गजल ही त्याच्या  साठीच लिहिलेली आहे.

कही छत थी, दिवारो-दर थे कही, मिला मुझको घर का पता देरसे,
दिया तो बहुत जिन्दगिने मुझे, मगर जो दिया वो दिया देरसे.

घराच छत  कुठे तर दरवाजे-भिंती कुठे भलतीकडेच असल्यामुळे मला, माझ आपलं पूर्ण  घर मिळायला उशीर झाला.
तस पाहिलं तर मला या जीवनात खूप काही मिळाल. प्रत्येकाला मिळत असतं. परंतु मला उशिरा मिळाल .
वेळ निघून गेली होती आता त्या मिळालेल्याची काहीच किंमत माझ्या जीवनात नव्हती,
 त्याची आवश्यक्यता हि नव्हती.

हुवा न कोई काम मामुलसे, गुजरे शबोरोज कुछ इस तरह
कभी चांद चमका गलत वक्तपर, कभी घरमें सुरज उगा देरसे.

काय कहाणी सांगू जीवनाची? प्रत्येक कामात अडचणी. कोणतच  काम सहजतेने झाले नाही.
आयुष्यातील दिवस रात्र (शबोरोज) असे गेले कि कधीच वेळेवर चंद्र उगवला नाही तर
सूर्य नेहमीच उशिरा उगवला.

ये इत्तेफ़ाक़त  का खेल है, यही है जुदाई, यही मेल है,
मै मुडमुडके देखा किया दूर तक, बनी वो खामोशी, सदा देरसे |

जीवनात घडणार्या गोष्टी या योगायोगाच्या असतात. मग एखाद्याची भेट काय आणि ताटातूट काय?
परंतु मी मागे वळून वळून क्षितिजा पर्यंत पाहत राहिलो कि कोणीतरी साद ( आवाज ) देईल. आम्हाला बोलावेल.
परंतु दर वेळेला एक भीषण शांतताच नजरेस पडली. आणि आसाच एक दिवस आवाज आला परंतु त्यावेळेस
उशीर झालेला होता.

कही रुक गये राह में बेसबब, कही वक्तसे पहले घर आई शब,
हुए बंद दरवाजे खुलखुलके सब, जहा भी गया मै - गया देरसे. |

आता या सर्वासाठी केव्हा केव्हा माझीच चूक होती ना. कारण नसताना आम्ही रस्त्यात थांबलो, तर कधी निघायच्या  वेळीच
अंधारून आलं. अनेक दरवाजे माझ्या साठी उघडले गेले, आणि बंद झाले. कारण मी प्रत्येक ठिकाणी उशीराच  पोहोचलो.

सजा दिनभि रोशन, हुई रातभी, भरे जाम, लहरी बरसात भी,
रहे साथ कुछ ऐसे हालत भी , जो होना था जल्दी हुआ देरसे ]

अस नाही कि आमच्या जीवनात बहार हि कधीच आली नाही. चमचमती रात्र कधीच आली नाही. पावसाळ्याचा आनंदही लुटला नाही, प्याले भरभरून रिकामे  झाले नाहीत. अस कही नाही. हे सर्व कही झाल, परंतु अशा वेळी झाल कि ज्या वेळी व्हायला हव होतं तेव्हा झाल नाही. .


दत्तात्रय पटवर्धन

Thursday, April 30, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग 6

सहाव्या शतकात चतुरंग हा खेळ पर्शियात आला. येथे गोट्यांची नावे पर्शियन भाषेत
अथवा उच्चाराप्रमाणे ठेवली गेली. पर्शियन भाषेत, 'चतुरंग' चे 'झतरंग' असे
झाले. अरबी मध्ये 'शतरंज' , मलाई मध्ये 'झीतोर' तर मंगोल मध्ये 'शतर'
अशी नावे बदलली. पर्शियांस या खेळात जास्त बदल करू शकले नाहीत
कारण अरबांनी याच शतकात येथे हल्ले केले आणि आपले राज्य स्थापन केले.
पर्शिअन साहित्यात 'कार्नामक'  नामक ग्रंथात, पहलवी भाषेत, या खेळाची माहिती मिळते.
पर्शियात 'फिर्दीसी' नावाचा कवी क ९५५ - १०१० या काळात होऊन गेला. त्याने 'शाह्नामा'
हे महाकाव्य लिहिले. या महाकाव्यात या खेळाविषयी विस्तृत माहिती मिळते.
याच महाकाव्यात एक दुसरी कथा बुद्धिबळ शोधाची दिलेली आहे.
एक राणी अत्यंत चिंतीत होती. तिची दोन सावत्र मुले, 'तल्हन्द' आणि 'गव्ह' यांच्यातील
 वैमनस्य हे तिच्या चिंतेचे कारण होते. दोघे सावत्र भाऊ असल्यामुळे सत्तेचा
खरा अधिकारी कोण यावरून त्याच्यात वैमनस्य निर्माण झालेले. एका युद्ध प्रसंगी राणीला
माहिती मिळते कि, तल्हन्द हा युद्धात मारला गेला. तिला गव्ह वर शंका येते.
शेवटी तिचा गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने तिच्या दरबारातील गुरु बुद्धिबळ पाटाची
निर्मिती करतात व त्यावरून राणीला दाखवतात कि युद्ध भूमीवर तल्हन्द हा कसा
युद्धाच्या थकव्यामुळे मेला न कि त्याच्या भावाच्या हाताने. हे स्पष्ट करीत असताना
 'shah mat ' (शाह मात ) या पर्सिअन शब्दाचा उपयोग केलेला आहे. या शब्दाचा अर्थ
' the king is dumbfounded or exhausted ' असा होतो. परंतु 'मात' या शब्दाचा अर्थ आपण
'राजाचा मृत्यू' ( The king is died ) असा घेतो. याच कथेतील या शब्दप्रयोगावरून
आपण 'शह आणि  मात' असा शब्दप्रयोग करू लागलो. पुढे हाच शब्द इंग्रजीत 'check mate'
म्हणून प्रचलित झाला. या पर्शिअन काळातील बुद्धिबळ सोंगट्या आज अस्तित्वात नाहीत
परंतु भारतीय आणि पर्शिअन लोकांची खेळतानाची चित्रे अशा अनेक पुस्तकांत तसेच महाकाव्यात
दिलेले आहेत. त्यावरून या खेळाचे कल्पना येते. 



दत्तात्रय पटवर्धन 

Friday, April 24, 2015

0 असे हे इंग्रजी शब्द , भाग ८



सध्या 'आप' पार्टी मध्ये घमासान चालू आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रशांत भूषण , योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेचा  भडीमार सुरु केला आहे. त्यामुळे आप पार्टीने प्रशांत भूषण  आणि योगेंद्र यादव यांना पार्टीतून निश्काशित केले. या वेळी प्रशांत भूषण म्हणाले, " AAP  actions remind of Stalinist purges."

आता "stalinist purge" म्हणजे काय? ते आपण पाहू. Purge म्हणजे to clear the unwanted, to remove or eliminate unwanted, म्हणजेच "आपल्याला नको असलेले बाजूला सारणे."
स्टालिन हा रशियातील एक हुकुमशाह. त्याला वाटत होते आपले एक छत्री राज्य रशियात असावे. म्हणून त्याने आपल्या विरोधकांचा बिमोड करण्यासाठी त्यांच्या वर  छल  तंत्राचा वापर सुरु केला. त्यांना लेबर क्यम्प मध्ये पाठवण्यात येत असे. त्याने २० मिलिअन लोकांना लेबर क्यम्प मध्ये पाठवले तेथील जुलूम असह्य झाल्यामुळे अर्धे मृत्युमुखी पडले. मिडिया वर कठोर निर्बंध लादण्यात आले. अशा अन्याया विरुद्धही कुणी कठोर पणे उभा राहिला तर त्याला सैबेरियात धाडण्यात येत असे. म्हणून प्रशांत भूषण व इतरांना जेव्हा आप पार्टीतून काढून टाकण्यात आले तेव्हा त्यांनी याची तुलना " stalinist purge " शी केली. ज्या प्रमाणे स्टालिन ने त्याला नको असलेल्यांना बळजबरीने दूर केले तसेच  केजरीवाल त्यांना नको असलेल्यांना दूर करीत आहेत.

मिड-डे च्या २३ एप्रिल, २०१५ च्या अंकात गौरव डुबे म्हणतात, "As Bollywood struggles to hit the bull's eye at the Box Office this year, American action thriller 'Furious 7' has grossed over Rs.100 crore in India." म्हणजेच, बॉलीवूड या वर्षी चांगला गल्ला मिळवण्यास झटत होते तेव्हा अमेरिकन थरार चित्रपट 'Furious 7' ने भारतात शंभर कोटीच्या वर विक्रमी कमाई  केली.

येथे Box Office म्हणजे 'an area in a theater where tickets are sold for movies, play etc. Income from ticket sales (as from a film) -- सिनेमागृहातील अशी जागा जिथे तिकीटाची विक्री होते किंवा अशा तिकीट विक्रीतून झालेली विक्रमी कमाई.

एखाद्या चित्रपटाबद्दल 'Box Office hit' असा शब्दप्रयोग सुद्धा केला जातो. याचे अर्थ त्या चित्रपटाने विक्रमी  कमाई केली.

त्याकाळी म्हणजेच अगदी शेक्सपिअर च्या काळात नाट्यगृहात प्रवेश करताना दरवाजावर तिकिटाचे पैसे एका पेटीत ( Box ) मध्ये टाकले जात असत. ती पेटी लहान असल्यामुळे लवकरच भरत असे. मग ती पेटी मागच्या ऑफिस मध्ये जाऊन रिकामी केली जात असे. पेटी लहान करण्याचे कारण म्हणजे जास्त पैसा पाहून चोरी करण्याचा मोह चोरांना किंवा दरोडेखोरांना होऊ नये. म्हणूनच मागच्या ऑफिस साठी 'Box office ' हा शब्द रुळला. व पुढे  तिकीट आली व तिकीट विक्री एका विशिष्ट ठिकाणी होऊ लागली व त्या ऑफिसला 'Box office' म्हणू लागले.


दत्तात्रय पटवर्धन

Sunday, April 19, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग 5.


आपण चतुरंग या खेळातील सोंगट्या बाबत पहिले. या सोंगट्या व त्याच्या चाली बद्द्ल आपण पाहू. संस्कृत
काळात या गोट्यांच्या चाली आणि त्यांचे बळ यात फारच अंतर आहे. त्यावेळेसच्या गोट्याचे बळ खूपच कमी होते. सोंगट्या जास्तीती जास्त एक किव्वा दोन घर चालत असत, तोही  एक हत्ती सोडला तर. आज हत्ती , वजीर (राणी), उंट यांचा लांब पल्ल्याचा मारा खेळाला गती देऊन जातो. अगदी दूर बसूनही या सोंगट्या शत्रू पक्षाच्या मोहरांवर नजर ठेऊन असतात, अगदी आजच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राप्रमाणे.

चतुरंग काळात राजा कोणत्याही दिशेला एक घर चालू शकत होता. आजच्या प्रमाणेच त्याकाळीही राजा अत्यंत महत्वाचे मोहरे होते. राजा मारला गेला कि खेळ संपायचा. आजच्या आधुनिक खेळात राजा मारला जात नाही. संकृत काळात राजा वर जर बळ असेल तर याची घोषणा करण्याची गरज नसे. त्यामुळे जर राजाला चेक / शह बसला असेल व ते खेळाडूच्या लक्षात आले नाही तर राजा मारला जायचा. आणि डाव अनपेक्षितपणे संपायचा. एखाद वेळी राजा हा अशा घरात सरकवला जायचा जेथे शत्रू पक्षाचे बळ आहे आणि मग राजा मारला जायचा.
त्यावेळी 'इललीगल चाल' ( illegal move ) ची संकल्पना नव्हती.

पटावरील दुसरी महत्वाची सोंगटी म्हणजे 'मंत्री' . मंत्री म्हणजे राजाचा सल्लागार (next to king ). "मंत्री" या संस्कृत शब्दापासूनच इंग्रजीत 'mentor' , 'monitor' सारखे शब्द आले. 'मंत्री' हि सोंगटी आजच्या 'राणी' ची पूर्वज. या सोंगटी ची चाल म्हणजे एक घर कर्ण रेषेत. समोर, मागे किव्वा बाजूला हा मंत्री चालू शकत नसे. राजाचा सहकारी म्हणून याला राजापेक्षा अर्धे बळ अशी संकल्पना होती.

तिसरे महत्वाचे मोहरे म्हणजे 'गज' (elephant), हे मोहरे आजच्या 'बिशप' चे पूर्वज. हे मोहरे एक घर कर्ण रेषेत किव्वा एक घर पुढे चालू शकत होते. अशा रीतीने 'गज' पाच घरात चालू शकत होता. या मागील संकल्पना अशी कि गजाचे चार पाय कर्ण रेषेत येणाऱ्या चार घरांवर आपले बळ दाखवत असे तर सोंड हि समोरील घरावर बळ प्रस्थापित  करत असे.

'अश्व' हे मोहरे म्हणजे आजचा' 'घोडा'. या घोड्याच्या चालीत आज पर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्या काळीही घोडा आजच्या प्रमाणेच अडीच घर चालतो.

प्यादे हे एक मोहरे ज्याला एक घर पुढे जाण्याचा अधिकार होता, तसेच शत्रूपक्षाचे मोहरे मारतान पुढील कर्ण रेषेतील घरात मारता येत असे. हे प्यादे पट  पार करून पलीकडे जात असे तेव्हा त्याचे 'मंत्री' या सोंगट मध्ये रूपांतरण होत असे.
'रथ' (chariot ) किव्वा रोका (boat , ship ) हे मोहरे आजच्या हत्तीच्या मोहऱ्याची प्रतिकृती होती. पटावरील हे एकच मोहरे असे होते ज्याला लांब पल्ल्याचामारा करण्याचे बळ होते. 'रोका' ( शिप ) या नावामुळे इतिहास तज्ञांचे म्हणणे असे होते कि भारतीय युद्ध पद्धतीत नौका हि नव्हती त्यामुळे हा खेळ भारताचा नाही. या विवाद बद्दल आपण पुढे पाहूच. तूर्त तरी एवडेच.

Tuesday, April 14, 2015

0 असे हे इंग्रजी शब्द ! भाग ७

मागील आठवड्यात मला फीड बॅक  द्वारा एक विचारणा करण्यात आली होती कि इंग्रजीत ' once in a blue moon' हा शब्द प्रयोग केला जातो. निळ्या चंद्राचा उपयोग कसा झाला. खरच आहे. चंद्र कधी निळा असू शकतो का? होय हे शक्य आहे. जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात विशिष्ट प्रकारचे बदल झाले तर हे शक्य आहे. परंतु हेही खचितच घडत. १८८३ मध्ये इंडोनेशियातील Mount Krakatoa येथे वोल्कॅनो स्पोट झाला आणि प्रचंड प्रमाणात धूळ आकाशात पसरली आणि आकाशाच्या वरील पातळीवर जमा झाली  त्यावेळी चंद्र निळसर दिसला होता. याला प्रकाशाच्या परवार्तानाचे  नियम कारणीभूत आहेत. अशा घटना १९८३, १९८० तसेच १९९१ मध्येही घडल्या. परंतु ' once in a blue moon ' मधील ब्लू मून ला वेगळच कारण आहे. आपणास  ठाऊक आहे पौर्णिमेचा चंद्र हा महिन्यातून एकदाच दिसतो. परंतु कधी कधी एखाद्या महिन्यात असा चंद्र दुसऱ्यांदा दिसतो. इंग्रज शेतकऱ्यांच्या कैलेंडर मध्ये हा पूर्ण चंद्राचा दिवस लाल रंगाने दर्शविला जात होता. परंतु ज्या महिन्यात तो दुसऱ्यांदा दिसत असे तो दिवस निळ्या रंगाने दर्शविला जात असे. आता हि घटना हि खचितच घडत असे. म्हणून जेव्हा एखादी घटना खचितच घडते त्याला "once in a blue moon" असे म्हणतात.

Once in a blue moon : something that happens rarely.

आताच काही दिवसापूर्वी भारत आणि इंग्लंड मधील कसोटी  शृंखला संपन्न झाली. भारताला  यात लाजिरवाणी हार पत्करावी लागली. त्यावेळेस कोच फ्लेचर व कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यावर कडाडून टीका झाली. त्यावेळी विश्वनाथ, भारताचा माजी खेळाडू, म्हणाला'
" I am not happy with his keeping and captaincy, he has got his own mind. He always keeps repeating that. He always expects a miracle. Miracles cannot happen all the time,it happens once in a blue moon."

म्हणजेच चमत्कार हे क्वचितच घडतात.

Mid day meal चा उपक्रम सरकारकडून राबवला जातो. अनेक शाळांमध्ये मुलांना मधल्या सुटीत या उपक्रमांतर्गत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. क्वचितच या सुविधा दिल्या जातात परंतु अनुदान  तर घेतले जातेच. अशाच एका पाहणीच वृत्त देताना ' The Shilong Times' या वृत्तपत्राने आपल्या १२ जून २०१२ च्या अंकात "School students deprived of midday meal scheme" या मथळ्या खाली एक लेख लिहिला होता. त्यातील एक वाक्य असे होते,
"Children who were spoken to, informed that they are not getting any foods items under the scheme, while adding " Only once in a blue moon cooked pulses are distributed in the school."

ज्या विद्य्रार्थ्यांना विचारले त्यांनी अशी माहिती पुरवली कि, " या उपक्रमांतर्गत आम्हाला कोणत्याही प्रकारचे अन्न दिले जात नाही क्वचितच कधीतरी शिजवलेली डाळ वाटली जाते."

एखादा मित्र  खूप दिवसांनी भेटला तर म्हणतो "दूज का चांद"  असाच हा once in a blue moon म्हणजे दूज का चांद. 

 दत्तात्रय पटवर्धन 

भाग 1
भाग 2
भाग 3
भाग 4
भाग 5

Monday, April 13, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग ४.

प्रथम भाग २ वाचा : भाग २ 

काय, मिळाला का आकडा
-
कि प्रयत्नच केला नाही. 
-
कि पेनातील शाई संपली
-       - कि गणित कच्च आहे?
-       - कि कठीण वाटतंय सारं!
असू दे काहीही उत्तर. इकडे लक्ष दे -   
१ ल्या घरात १ दाणा,
११ व्या घरात १०२४ (thousand ),
२१ व्या घरात १०४८५७६ (millions ), 
३१ व्या घरात १०७३७४१८२४ (Billions ),
४१ व्या घरात १०९९५११६२७७७६ (trillions ), 
५१ व्या घरात ११२५८९९९०६८४२६२४ ( qudrallions ),
६१ व्या घरात ११५२९२१५०४६०६८४६९७६ ( quintillions ) , 
६४ व्या घरात ९२२३३७२०३६८५४७७५८०८,
अबब!! काय हा आकडा. नुसता डोक्याचा पोपट झाला! आता राजा त्याची इच्छा पूर्ण करू शकेल काय? राजा आपल्यासारखाच भांबावलेला... 
राजाने मंत्र्याला बोलावले आणि विचारता झाला, “तुला माहित असतानाही तू अस का केलेस?  त्यावर मंत्री म्हणाला, राजन आपण एक दिवस लढाई वरून परत  येतं होता. रस्त्यात एका व्यक्तीला भेटलात. आपणास ठाऊक होते कि हि व्यक्ती प्रतिभासंपन्न आहे. आपण त्या व्यक्तीला प्रश्न केला कि जीवनाचा अर्थ काय आहे? पुढे म्हणालात कि माझ्या जवळ जास्त वेळ नाही लवकर सांग, मला पूर्ण राज्याचा कारभार पाहायचा असतो. अगदी थोड्या शब्दात सांग. राजन, आपल्या त्या बोलण्यातून अहंकार प्रगट होत होता.
त्या व्यक्तीने एक गव्हाचा दाणा उचलला  आणि तो  आपणास दाखवला. आपणास त्याच्या अर्थ उमगला नाही म्हणून आपण त्या व्यक्तीला अपमानित केले.राजन, ती व्यक्ती अन्य कोणी नसून मीच आहे. आपणास धडा शिकवण्यासाठी असे करावे लागले.मंत्री महोदय म्हणाले,राजन, हा गव्हाचा दाणा दिसायला चिमुकला, लहान, यकश्चित असला तरी त्यात साऱ्या जीवनाचं रहस्य, जिज्ञासा आणि उत्कंठा दडलेली आहे, जशी बुद्धिबळाच्या ह्या रम्य खेळात. दिसायला लघुत्तम, यकश्चित, साधा सरळ असला म्हणून आव्हेरू नका कारण लघुत्तम, यकश्चित, साधं सरळ प्याद वेळ आल्यावर राजाच्या जागी विराजमान होतं. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली  राजानं मंत्र्याच्या तैल बुद्धीची हसून पावती दिली. ते एकमेकांचे चांगले मित्र झाले. बुद्धिबळ त्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग झाले.
आपल्या जीवनात असाच सन्मित्र आपल्याला लाभो, हीच ईश चरणी प्रार्थना!


दत्तात्रय पटवर्धन  

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग ३.

वास्तविक, आज बुद्धिबळाच्या एका  आख्यायिकेचा क्रम होता. असे म्हणतात, "या खेळात जिंकणाऱ्याला इतक विशेष वाटत नाही कदाचित, परंतु हरणाऱ्याला मात्र फार चुटपूट लागून जाते' ह्या प्रतिक्रियेने जुन्या विश्वचषकीय खेळाडूंचे हरण्याचे  किस्से एकामागून एक मनाच्या प्यातून बाहेर पडू लागले.
 एक असा गोड गैरसमज आहे कि या खेळाला कुशाग्र बुद्धी लागते म्हणून बुद्धिबळ म्हणजे तासंतास दोन हातांमध्ये डोकं खुपसुन विचार करण्याचा गेम अशी व्याख्या होते.
बुद्धी तर प्रत्येक खेळात लागते, बुद्धीचं कौशल्य प्रत्येक खेळात पणाला लागतं. बुद्धीचं सोन्यासारख आहे. भट्टीतून तावून-सुलाखून निघाल्या शिवाय कुंदन होत नाही त्याचप्रमाणे बुद्धी कसाला लागल्याविना प्रगल्भ होत नाही.
     बुद्धिबळात बुद्धीचा कस त्या चौकोनी पटावरच्या विविध गोट्याच्या चाली ध्यानात ठेवण्यात आणि भविष्यात त्याची होणारी हालचाल किती परिणामकतेने करण्यात लागतो, ज्यायोगे प्रतिस्पधी चूका करेल व गेम आपल्या हाती येईल. येथे एक छोटीशी चूक तुम्हाला शिखरावरून पार रसातळाला नेते, तुमचा सारा अभ्यास, सारा विचार वाया जातो. दर्शकाला वाटतं जणू हरणाऱ्याची बुद्धी निकामी झाली, अन चाहत्याच्या नजरेतला तो भाव खेळाडूला खटकत असतो. बरे,  इतर खेळात पीचला, ढगाळ वातावरणाला, अम्पायारिंगला, सह-खेळाडूला दोष दिला जाऊ शकतो, पण येथे ज्याची चूक त्याची हार, हाच शिरस्ता. 

     नुकत्याच संपलेल्या विश्व-अजिंक्यपदाच्या लढतीत आनंद दोन डाव हरल्यानंतर त्याला एका भारतीय पत्रकाराने विचारले, " या पुढची आपली रणनीती काय असेल" यावर आनंद म्हणाला ," I will do the best". नॉर्वेच्या पत्रकाराने प्रश्न केला, "Will you please elaborate, what best you intend to do?" आनंद ताबडतोब उत्तरला, " to do the best means to do the best, that much English you don't understand ?".  हरण्याच्या नुसत्या विचाराने विश्वनाथन आनंद सारखा विश्व-विजयी, कसा आणि किती तणावाखाली येतो, ते कळते. 

     असाच चौथा विश्वविजेता Alexander Alekhine एकदा एका सामान्य खेळाडू कडून हरला, [१९२३ कार्ल्सबांड  (Carlsband). प्रतिस्पर्धी  खेळाडू बहुदा येट्स (Yates )]खरे पहिले तर स्वतःच्याच घोडचूकीने तो हरला. बुद्धिबळात चूक आणि हार’ हे एकच नातं आहे, एकामागे दुसरा येउन टपकतोच. या गड्याने  खिलाडूपणे युद्ध मैदानावर विजेत्याची  मन:पूर्वक प्रशंसा करण्याचे नाटक कसेतरी वठवले पण इम्पेरिअल हॉटेलच्या आपल्या खोलीत आल्यावर अनावर होऊन त्याने खोलीतील खुर्च्या, आरश्यांची तोडफोड केली. ज्या फर्निचरवर हात पडेल ते ते तोडले.  बाहेर मात्र सगळे त्याच्या खिलाडूवृत्तीचे कोड कौतुक करत होते अन महाशय तोडलेल्या फर्निचरचे बिल चुकते करत होते.  
      योगायोग पहा, हाच खेळाडू पुन्हा एकदा असाच हरला. त्याने resign  केले आणि हातात राजा घेऊन जोरात भिरकावला. त्यावेळी बुद्धिबळाच्या सोंगट्या जड होत्या, अगदी शस्त्रासारख्या.  शेवटी  हरण्यासाठी कोण खेळतो – एका चुकीमुळे जिंकणे अन हरणे मनाला मोठं लागून जातं अन असे किस्से घडतात.   

      खेळातील तणावही बऱ्याच वेळा अनाकलनीय गोष्टी घडवतात. स्टेनिज ( Steiniz) हा एकदा, पेरीसच्या (Paris ) टूर्नामेंट मध्ये असाच एका शुल्लक वादावरून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर थुंकलाच नाही तर त्याचे डोके खिडकी मध्ये दाबले. हा प्रतिस्पर्धी बहुदा ब्लैकबर्न होता.

      आनंद परवडला, alekhine परवडला, परंतु ग्रैंडमास्टर निम्झोवीच तर भयंकरच. काय केल असेल या गड्याने विचार करू शकता? नाही नाहाही असाच एकदा डाव हरला आणि त्याच टेबलवर चढून जोरजोरात ओरडू लागला , "मी या मुर्खाबरोबर हरलोच कसा?" येव्हडेच नाही तर त्याने त्या खेळाडूला उचलून खिडकीतून बाहेरच फेकले. सत्यते बद्दल शंका यावी असेच हे किस्से! 

दत्तात्रय पटवर्धन       

  

Wednesday, January 14, 2015

0 चला थोडं आडवाटेने जाऊ या! भाग २


वैदिक गणितात एकंदर सोळा सूत्रे व तेरा उपसुत्रे आहेत. त्यातील एक सूत्र आहे 'एकाधीकेन पूर्वेण' , आधीच्या अंकापेक्षा एक जास्त. ( By one more than the previous one).

उदा. कोणतीही संख्या जिचा शेवट ५ ने होतो त्या संख्यांचा  वर्ग करताना या सूत्राचा उपयोग होतो. तो कसा ते आपण आता पाहू,

समजा तुम्हाला २५ चा वर्ग करायचा आहे,

25  = ?

यात आपण उत्तराचे दोन भाग करतो ----

एक म्हणजे पाचाचा वर्ग व दुसरा म्हणजे पाचच्या आधीचा अंक त्यापेक्षा एक जास्त (एकाधीकेन पूर्वेण )

२५  =  (२ + १) २ / 52   ( येथे प्रथम पाचाचा वर्ग केला. तो २५ येतो. नंतर पाचच्या आधी येणारा अंक आहे २, यापेक्षा एक जास्त ( २ +१ ) म्हणजे ३, याला दोन ने गुणायचे. म्हणजे येतील ६.)

        =  ६२५

३५  =   ?

       =  (३ + १) x  3 / ५  ( येथे प्रथम पाचाचा वर्ग केला. तो २५ येतो. नंतर पाचच्या आधी येणारा अंक आहे २, यापेक्षा एक जास्त ( ३ +१ ) म्हणजे ४, याला ३  ने गुणायचे. म्हणजे येतील १२)
       =   १२२५

११५  =  ?

         = (११  + १ ) x ११  / ५   ( येथे प्रथम पाचाचा वर्ग केला. तो २५ येतो. नंतर पाचच्या आधी येणारा अंक आहे ११, यापेक्षा एक जास्त ( ११ +१ ) म्हणजे १२ , याला ११  ने गुणायचे. म्हणजे येतील 120.)

        =  १२ x  ११ / २५

        =  १३२२५

अशा रीतीने आपण एकम स्थानी ५ असलेल्या 
 संख्यांचे वर्ग तोंडी करू शकतो.





Wednesday, January 7, 2015

1 वळून पाहताना : भाग १३




‘आमची’ मुंबई जी राष्ट्राची आर्थिक राजधानी मानले जाते व जी जगातील सहावी सर्वात जास्त लोकसंख्या असलेली महानगरी मानली जाते, त्या शहरावर फिदाऐन हल्ला करण्याचा घाट पाकीस्थानने अतिरेकी संघटनाना हाताशी घेऊन केला. हा भयानक हल्ला मानवी नात्यांना काळीमा फासणाराच नव्हता तर एखाद्या मोठ्या भुकंपा प्रमाणे मुंबई, महाराष्ट्र, भारतालाच नव्हे तर अमेरिका व अन्य युरोपीय देशानाही हादरविणारा होता. हा हल्ला म्हणजे लष्कर-ए-तयब्बा ने संघटितपणे अनुक्रमे २ व १२ ठिकाणी केलेले बॉम्बस्फोट व अंदाधुंद गोळीबार होते. २६ नोव्हेंबर, २००८ ला सुरु झालेले हे भयनाटय २९ नोव्हेंबर, २००८ पर्यंत सुरु होते ज्यात अंदाजे १६६ जणांचा बळी गेला तर ३०८ जण जखमी झाले. हल्ल्याची व्याप्ती ध्यानात यावी म्हणून त्या आठ ठिकाणांची नावे देत आहे. १. छ.शि.ट. रेल्वे स्टेशन, २. ओबेरॉय हॉटेल, ३. ताज हॉटेल, ४. लेओपोल्ड क्याफे, ५. कामा हॉस्पिटल, ६. मेट्रो सिनेमा, ७. टाईम्स ऑफ ईंडीयाच्या मागील लेन, व 8. माझगाव व विलेपार्ले चे बॉम्बस्फोट.

     २९/११ ला एस.आय.टी. ने अतिरेक्याना हुसकाविण्याचे कार्य पूर्ण केले. ह्या हल्ल्यात ९ आतंकवादी मारले गेले तर एक जिवंत पकडला गेला – अजमल कसाब. ही मुंबई पोलिसांची एक फार मोठी उपलब्धी होती ज्यामुळे ह्या हल्लाची नाळ पाकिस्तानच्या आय.एस.आय. अन लष्करशी जोडली गेली पण त्याच्या कबुलीजबाबाने त्यांची निवड कशी झाली, त्यांना ट्रेनिंग कोणी, कुठे व कसे दिले, त्यांना कोणकोणती हत्यारे, संपर्क सुविधा, दिल्या गेल्या होत्या, त्यांचे गाईड्स व गुप्त संदेशवहन, इ ची माहिती आपल्या तपासी संघटनांना मिळू शकली व त्याचा ही केस सोडविण्यासाठी खूप फायदा झाला. त्याने दिलेल्या माहिती प्रमाणे जवळ-जवळ २६ जणांच्या एका गटाला नाविक युद्धाचे प्रशिक्षण पाकव्याप्त काश्मिरातील मुजफराबाद च्या डोंगराळ भागातील अतिरेकी केंद्रावर देण्यात आले होते व त्यासाठी पाक सेनेचे निवृत्त सेनाधिकारी व आय.एस.आय. चे अधिकारी नियुक्त केले होते. ह्या प्रशिशाणाचा भाग म्हणून एक विशिष्ठ प्रशिक्षण मंगला डेम वर देण्यात आले होते.

ह्यापैकी १० जणांना विशेषकरून निवडण्यात आले व त्यांना नाविक, समुद्रात पोहोणे, अत्याधुनिक हत्यारे (चीनी बनावटीच्या व पाक सेनेत वापरल्याजाणाऱ्या हल्ला करण्याच उपयुक्त AK-57 म्हणजे AK-47 या रशियन बनावटीच्या बदुकीची सुधारून वाढविलेले आवृत्तीच म्हणा).  व दारुगोळा कसा कुठे व केव्हा वापरायचा याचे विधिवत प्रशिक्षण दिले गेले. ह्याच बरोबर हल्याच्या `चार ठिकाणाची ब्लू-प्रिंट्स दिल्या गेली ज्यायोगे हाल्लेखोरांना त्यांचे कार्य विनासायास करता यावे. VOIP फोन्स त्याना पाकीस्थानातील त्यांचा मार्गदर्शकाशी वेळोवेळी संपर्क साधण्यासाठी दिले गेले होते आणि प्रत्यक्ष हल्ल्याच्यावेळी झालेली संभाषणे टेप केलेली आहेत. दहापैकी नऊ जणांना यमसदनास पाठविण्यात आले. दुर्दैवाने मृतांमध्ये १० देशांतील २८ नागरिक होते.

मुंबई पोलिसांनी ३७ संदिग्ध व्यक्तीना अटक केली. त्यानंतरही वेळोवेळी देशात वा परदेशात ह्या कटाशी संबंधित व्यक्तीना अटक करण्याचे सत्र सुरु होते. त्यातला कुख्यात अमेरिकन राष्ट्रीयत्व असलेला पाकीस्थानी वंशाचा डेविड हेडली आठवत असेलच. भारताने नंतर हेडलीची मागणी अमेरिकेकडे केली असता त्याच्यावर अमेरिकेतच केस केली जाईल व आवश्यक वाटले तर भारतीय संस्थेला त्याची जबानी अमेरिकेतच घेण्याची मुभा दिली जाईल असे सांगण्यात आले. अमेरिकेची ही सारवासारवी कशासाठी होती? आय.एस.आय. बरोबर अमेरिकन गुप्तचर संस्थेचा ह्यात सहाभाग होता कां? अशी शंका घेण्यास जागा उरते.

दिनांक २५/२/२००८ रोजी अजमल कसाबवर ११,००० पानी आरोप-पत्र एकूण ८६ गुन्ह्यासाठी दाखल करण्यात आले. दिनांक ७/५/२००९ ला ट्रायल सुरु झाली. प्रथम: कसाबने आपल्यावरील आरोप नाकारले पण नंतर दिनांक २०/७/२००९ रोजी ते मान्य केले. कालांतराने सर्वच्या सर्व गुन्ह्यासाठी त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा फर्माविण्यात आली. त्यावर कसाबने २१/२/११ ला  उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाने ते नाकारत खालच्या कोर्टाने दिलेली फाशीची शिक्षा कायम केली. कसाबने उच्चतम न्यायालयात अपील केले पण तेही १० आठवड्याच्या सुनावणीनंतर उच्चतम न्यायालयाने दिनांक २९/८/२०१२ ला नाकारत त्याचा मृत्युदंड कायम ठेवला. सरते शेवटी कसाबला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये दिनांक २१/११/२०१२ ला सकाळी ०७.३० मि. फासावर लटकविण्यात आले अन एक काळा कुट्ट अध्याय संपला.

मुंबई हल्ला कशासाठी, कां असे अनंत प्रश्न मनात नाही म्हटले तरी उभे राहतात. बघू या, उतारे मिळतात का!

प्रकाश पटवर्धन