Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, April 13, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग ३.

वास्तविक, आज बुद्धिबळाच्या एका  आख्यायिकेचा क्रम होता. असे म्हणतात, "या खेळात जिंकणाऱ्याला इतक विशेष वाटत नाही कदाचित, परंतु हरणाऱ्याला मात्र फार चुटपूट लागून जाते' ह्या प्रतिक्रियेने जुन्या विश्वचषकीय खेळाडूंचे हरण्याचे  किस्से एकामागून एक मनाच्या प्यातून बाहेर पडू लागले.
 एक असा गोड गैरसमज आहे कि या खेळाला कुशाग्र बुद्धी लागते म्हणून बुद्धिबळ म्हणजे तासंतास दोन हातांमध्ये डोकं खुपसुन विचार करण्याचा गेम अशी व्याख्या होते.
बुद्धी तर प्रत्येक खेळात लागते, बुद्धीचं कौशल्य प्रत्येक खेळात पणाला लागतं. बुद्धीचं सोन्यासारख आहे. भट्टीतून तावून-सुलाखून निघाल्या शिवाय कुंदन होत नाही त्याचप्रमाणे बुद्धी कसाला लागल्याविना प्रगल्भ होत नाही.
     बुद्धिबळात बुद्धीचा कस त्या चौकोनी पटावरच्या विविध गोट्याच्या चाली ध्यानात ठेवण्यात आणि भविष्यात त्याची होणारी हालचाल किती परिणामकतेने करण्यात लागतो, ज्यायोगे प्रतिस्पधी चूका करेल व गेम आपल्या हाती येईल. येथे एक छोटीशी चूक तुम्हाला शिखरावरून पार रसातळाला नेते, तुमचा सारा अभ्यास, सारा विचार वाया जातो. दर्शकाला वाटतं जणू हरणाऱ्याची बुद्धी निकामी झाली, अन चाहत्याच्या नजरेतला तो भाव खेळाडूला खटकत असतो. बरे,  इतर खेळात पीचला, ढगाळ वातावरणाला, अम्पायारिंगला, सह-खेळाडूला दोष दिला जाऊ शकतो, पण येथे ज्याची चूक त्याची हार, हाच शिरस्ता. 

     नुकत्याच संपलेल्या विश्व-अजिंक्यपदाच्या लढतीत आनंद दोन डाव हरल्यानंतर त्याला एका भारतीय पत्रकाराने विचारले, " या पुढची आपली रणनीती काय असेल" यावर आनंद म्हणाला ," I will do the best". नॉर्वेच्या पत्रकाराने प्रश्न केला, "Will you please elaborate, what best you intend to do?" आनंद ताबडतोब उत्तरला, " to do the best means to do the best, that much English you don't understand ?".  हरण्याच्या नुसत्या विचाराने विश्वनाथन आनंद सारखा विश्व-विजयी, कसा आणि किती तणावाखाली येतो, ते कळते. 

     असाच चौथा विश्वविजेता Alexander Alekhine एकदा एका सामान्य खेळाडू कडून हरला, [१९२३ कार्ल्सबांड  (Carlsband). प्रतिस्पर्धी  खेळाडू बहुदा येट्स (Yates )]खरे पहिले तर स्वतःच्याच घोडचूकीने तो हरला. बुद्धिबळात चूक आणि हार’ हे एकच नातं आहे, एकामागे दुसरा येउन टपकतोच. या गड्याने  खिलाडूपणे युद्ध मैदानावर विजेत्याची  मन:पूर्वक प्रशंसा करण्याचे नाटक कसेतरी वठवले पण इम्पेरिअल हॉटेलच्या आपल्या खोलीत आल्यावर अनावर होऊन त्याने खोलीतील खुर्च्या, आरश्यांची तोडफोड केली. ज्या फर्निचरवर हात पडेल ते ते तोडले.  बाहेर मात्र सगळे त्याच्या खिलाडूवृत्तीचे कोड कौतुक करत होते अन महाशय तोडलेल्या फर्निचरचे बिल चुकते करत होते.  
      योगायोग पहा, हाच खेळाडू पुन्हा एकदा असाच हरला. त्याने resign  केले आणि हातात राजा घेऊन जोरात भिरकावला. त्यावेळी बुद्धिबळाच्या सोंगट्या जड होत्या, अगदी शस्त्रासारख्या.  शेवटी  हरण्यासाठी कोण खेळतो – एका चुकीमुळे जिंकणे अन हरणे मनाला मोठं लागून जातं अन असे किस्से घडतात.   

      खेळातील तणावही बऱ्याच वेळा अनाकलनीय गोष्टी घडवतात. स्टेनिज ( Steiniz) हा एकदा, पेरीसच्या (Paris ) टूर्नामेंट मध्ये असाच एका शुल्लक वादावरून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर थुंकलाच नाही तर त्याचे डोके खिडकी मध्ये दाबले. हा प्रतिस्पर्धी बहुदा ब्लैकबर्न होता.

      आनंद परवडला, alekhine परवडला, परंतु ग्रैंडमास्टर निम्झोवीच तर भयंकरच. काय केल असेल या गड्याने विचार करू शकता? नाही नाहाही असाच एकदा डाव हरला आणि त्याच टेबलवर चढून जोरजोरात ओरडू लागला , "मी या मुर्खाबरोबर हरलोच कसा?" येव्हडेच नाही तर त्याने त्या खेळाडूला उचलून खिडकीतून बाहेरच फेकले. सत्यते बद्दल शंका यावी असेच हे किस्से! 

दत्तात्रय पटवर्धन       

  

No comments: