Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, April 13, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग ४.

प्रथम भाग २ वाचा : भाग २ 

काय, मिळाला का आकडा
-
कि प्रयत्नच केला नाही. 
-
कि पेनातील शाई संपली
-       - कि गणित कच्च आहे?
-       - कि कठीण वाटतंय सारं!
असू दे काहीही उत्तर. इकडे लक्ष दे -   
१ ल्या घरात १ दाणा,
११ व्या घरात १०२४ (thousand ),
२१ व्या घरात १०४८५७६ (millions ), 
३१ व्या घरात १०७३७४१८२४ (Billions ),
४१ व्या घरात १०९९५११६२७७७६ (trillions ), 
५१ व्या घरात ११२५८९९९०६८४२६२४ ( qudrallions ),
६१ व्या घरात ११५२९२१५०४६०६८४६९७६ ( quintillions ) , 
६४ व्या घरात ९२२३३७२०३६८५४७७५८०८,
अबब!! काय हा आकडा. नुसता डोक्याचा पोपट झाला! आता राजा त्याची इच्छा पूर्ण करू शकेल काय? राजा आपल्यासारखाच भांबावलेला... 
राजाने मंत्र्याला बोलावले आणि विचारता झाला, “तुला माहित असतानाही तू अस का केलेस?  त्यावर मंत्री म्हणाला, राजन आपण एक दिवस लढाई वरून परत  येतं होता. रस्त्यात एका व्यक्तीला भेटलात. आपणास ठाऊक होते कि हि व्यक्ती प्रतिभासंपन्न आहे. आपण त्या व्यक्तीला प्रश्न केला कि जीवनाचा अर्थ काय आहे? पुढे म्हणालात कि माझ्या जवळ जास्त वेळ नाही लवकर सांग, मला पूर्ण राज्याचा कारभार पाहायचा असतो. अगदी थोड्या शब्दात सांग. राजन, आपल्या त्या बोलण्यातून अहंकार प्रगट होत होता.
त्या व्यक्तीने एक गव्हाचा दाणा उचलला  आणि तो  आपणास दाखवला. आपणास त्याच्या अर्थ उमगला नाही म्हणून आपण त्या व्यक्तीला अपमानित केले.राजन, ती व्यक्ती अन्य कोणी नसून मीच आहे. आपणास धडा शिकवण्यासाठी असे करावे लागले.मंत्री महोदय म्हणाले,राजन, हा गव्हाचा दाणा दिसायला चिमुकला, लहान, यकश्चित असला तरी त्यात साऱ्या जीवनाचं रहस्य, जिज्ञासा आणि उत्कंठा दडलेली आहे, जशी बुद्धिबळाच्या ह्या रम्य खेळात. दिसायला लघुत्तम, यकश्चित, साधा सरळ असला म्हणून आव्हेरू नका कारण लघुत्तम, यकश्चित, साधं सरळ प्याद वेळ आल्यावर राजाच्या जागी विराजमान होतं. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली  राजानं मंत्र्याच्या तैल बुद्धीची हसून पावती दिली. ते एकमेकांचे चांगले मित्र झाले. बुद्धिबळ त्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग झाले.
आपल्या जीवनात असाच सन्मित्र आपल्याला लाभो, हीच ईश चरणी प्रार्थना!


दत्तात्रय पटवर्धन  

No comments: